शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वाहतुकदारांवर शेतकरी संपामुळे नामुष्की

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. २ :

आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी संप करून शेतमाल आणि शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वाहतुकदारांवर कालपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे नामुष्की ओढवली आहे.

कालपासून नाशिक बाजार समिती सह जिल्ह्यातील विविध बाजारसमित्यांमधील मालवाहू वाहने उभी करून ठेवण्यात आल्याचे चित्र होते.

शेतकऱ्यांच्या संपात मालवाहतूकदारांनी सहभागी व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला प्रतिसाद मिळाल नाही. त्यामुळे या संपानंतर आता आपोआप गाड्या बंद ठेवण्याची नामुष्की वाहतुकदारांवर आली आहे.

एरवी गाडीभाडे भरताना शेतकऱ्यांना रडविणाऱ्या वाहतूकदारांना संपामुळे शेतकऱ्यांसमोर नाकदुऱ्या काढण्याशिवाय गत्यंतर उरले नसून आपला खरा व्यवसाय व्यापाऱ्यांमुळे नव्हे, तर शेतकऱ्यांमुळे चालतो याची त्यांना जाणीव झाली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

*