Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पावसामुळे रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत; ट्रॅकवर पाणी, लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरासह जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजच्या पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला आहे. नाशिकरोड ते इगतपुरीदरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने अनेक गाड्या खोळंबल्या आहेत.

गेल्या दीड ते दोन तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. तिकडे पाडळी ते घोटी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे ट्रेन घोटी स्थानकात थांबविण्यात आली आहे.

तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे कुर्ला-मनमाड गोदावरी एक्सप्रेस तासाभरापासून घोटी रेल्वेस्थानकावर उभी आहे. प्रवाशांचे हाल झाले आहे. रेल्वे ट्रकवर पाणी आल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. ठिकठिकाणी रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस इगतपुरीत थांबवण्यात आली असून गाडीला उशीर होण्याची शक्यता आहे. पुणे भुसावळलाही उशीर होणार आहे. देवळाली कॅम्पला तपोवन एक्स्प्रेस उभी आहे. राजधानी एक्स्प्रेस इगतपुरीला उभी असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!