Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सीबीएस, त्र्यंबकनाका, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रेडक्रॉस परिसरात वाहतूक कोंडी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

स्मार्टरोडचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. या परिसरात नवीन सीबीएस आणि जुने सीबीएस येत असल्याने वाहतूक कोंडी होऊन याचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागला. विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन सुरु आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी याठिकाणी झाली आहे.

त्र्यंबक नाका परिसर. गडकरी चौक, शरणपूर रोड वगळता पोलीस कर्मचारी कुठेही आढळून न आल्याने वाहतूक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसले. सीबीएस ते मेहेर सिग्नल वाहतूक पूर्णपणे बंद केल्यामुळे वाहनधारक कोंडीत सापडले होते. अनेक वाहनधारकांनी नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रचंड संताप व्यक्त केला.

त्र्यंबक नाक्यावर बराच वेळ रुग्णवाहिका कोंडीत सापडल्यानंतर रुग्णवाहिकेला विरुद्ध दिशेने रस्ता करून दिला. तिकडे  गडकरी चौकात कालिका यात्रोत्सव सुरु असल्याने येथून मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.

सिग्नल यंत्रणा बंद 

गंजमाळ आणि रेडक्रॉस येथील सिंगल वगळता मेहेर, सीबीएस, त्र्यंबकनाका, शरणपूर रोड येथील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडली होती. काही वाहनधारकांनी पोलीस कर्मचारी नसल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास काहीशी मदत झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!