Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

नाशिक शहरात प्रचंड वाहतूक कोंडी; सर्वसामान्यांना नाहक त्रास

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी चार मोर्चे निघाल्यामुळे सीबीएस, त्र्यंबकनाका, गडकरी चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीत ऐन दुपारी अडकलेल्या नाशिककरांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला.

मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने मोर्चा मार्गात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळाली. त्यात सीबीएस, खडकाळी, सारडा सर्कल, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबकनाका आदी परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे ऐन दुपारी शहरात चक्का जाम झाले होते.

वाहतूक कोंडीचा फटका पर्यायी मार्गांवरील वाहतूकीसही बसला. अनेक वाहनधारकांनी दुतर्फा वाहने घातल्यामुळे वाहतुकीत अधिकची भर पडली.

त्र्यंबक नाका परिसरातून गंगापूर रोडला जाणाऱ्या व्यक्तीला एक तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. मोर्चाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिसांना वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी यायला काहीसा उशीर झाला त्यामुळे वाहतूक कोंडी वाढल्याचे सांगितले जात आहे.

कुठलीही पूर्वसूचना न दिल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे अनेकजन आजच्या वाहतूकीत अडकून पडले. शहराच्या मध्यवर्ती रस्त्याचे काम स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असल्यामुळे याठिकाणीही वाहतूक कोंडी झाली. परिणामी नाहक त्रास नाशिककरांना सोसावा लागला.

दरम्यान, वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागल्याची माहिती प्रतिनिधीने दिली.

कल्पना असूनही पोलिसांचे मौन 

शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या स्मार्ट रोडच्या कामामुळे अगोदरच नाशिककर वाहतूक कोंडीने हैराण आहेत. अशातच एकाच दिवशी चार मोर्चे निघाले. वास्तविक याची परवानगी पोलीस प्रशासनानेच दिली असल्यामुळे त्यांनी नागरिकांना याबाबत कोणतीही सूचना दिली नाही. तसेच वाहतूक वळविण्याबाबत कोणतेही नियोजन दिसले नाही परिणामी शहरातील सर्वच प्रमुख मार्ग, चौक वाहतूक कोंडीत अडकले होते. यामुळे सामान्य नागरिकांचा ऐनवेळी खोळंबा झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!