Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचा नियोजित संप मागे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने उद्या (दि. १७) पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. संपाच्या आदल्या दिवशीची प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासंदर्भात आणि अंमलबजावणीसंदर्भात लेखी आश्वासन दिल्यामुळे उद्याचा नियोजित संप मागे घेत असल्याची माहिती कामगार सेनेकडून देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने कामगारांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी  अन्यथा १७ जुलै पासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, आज प्रशासनाने नमते घेत लवकरात लवकर मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल याबाबतचे लेखी आश्वासन कामगार सेनेचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण तिदमे यांना दिले. त्यानंतर उद्याचा नियोजित संप मागे घेत असल्याची माहिती तिदमे यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!