Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याटोमॅटोने रडवले; २० किलोसाठी खर्च ४७ रुपये, भाव ३० रुपये, बळीराजा संकटात

टोमॅटोने रडवले; २० किलोसाठी खर्च ४७ रुपये, भाव ३० रुपये, बळीराजा संकटात

खडकमाळेगाव | वार्ताहर Khadakmalegaon

सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. गगनाला गवसणी घालणारे भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीत तर दुसरीकडे बळीराजाने हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतलेल्या शेतमालाला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी पुन्हा सुलतानी संकटात सापडला आहे. निफाड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या टोमॅटोला अवघ्या पन्नास पैसे एक रुपये दर मिळाल्याने त्यांना खिशातून पैसे टाकून आडत हमाली आणि वाहतुकीचे पैसे द्यावे लागल्याची घटना घडली…. (Tomato rate down in Nashik district)

- Advertisement -

विशेष म्हणजे, सुतळी, तार बांबू आणि रोपट्यांचा खर्च आणि स्वतःची मेहनत याची बेरीज केली तर टोमॅटो लागवडीनंतर एक नया पैसाही या शेतकऱ्याच्या हातात पडलेला दिसत नाही. अशी भयावह परिस्थिती पिंपळगाव तसेच नाशिकच्या बाजारसमितीमध्ये (Pimpalgaon & Nashik APMC) अनुभवण्यास मिळत आहे.

यामुळे शेतकरी संतापले असून विक्री करण्यापेक्षा जनावरांना घातलेला किंवा शेतात खत झाले तर काय वाईट असे म्हणत शेतकरी बाजारात आणण्यास टाळत असल्याचे दिसून येत आहे.

२३ ऑगस्ट रोजी पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खडकमाळेगाव (Khadakmalegaon) येथील शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. त्यांच्या २० किलोच्या एका क्रेटला ३० रुपये दर मिळाला. त्यांनी एकूण १३ क्रेट माल विक्रीसाठी आणला होता.

येथील अंबिका व्हेजीटेबल (Ambika Vegetable) या आडतीत त्यांनी माल दिला होता. १३ क्रेटचे एकूण ३९० रुपये मिळाले त्या पैशांतून आडत, हमाली व गाडीभाडे असा प्रतीक्रेट २७ रुपये पन्नास पैसे खर्च झाला.

शेतातील टोमॅटो खुडणी प्रतीक्रेट २० रुपये याप्रमाणे ४७ रुपये ५० पैसे असा एकूण खर्च झाला. १३ क्रेटची विक्री ३९० रुपये व प्रतीक्रेट ४७ रुपये ५० पैसे खर्च झाला. यामुळे एकूण खर्च ६१७ रुपये पन्नास पैसे झाला. टोमॅटो पिकवणे म्हणजे घरघालू धंदा झाल्याची संतप्त शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या