Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आज पुन्हा तीन नवे कोरोनाबाधित; रुग्णांचा आकडा १४ वर

नाशिकमध्ये आज पुन्हा तीन नवे कोरोनाबाधित; रुग्णांचा आकडा १४ वर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये आज पुन्हा तीन रुग्णांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. यामध्ये मालेगावमध्ये एक रुग्ण वाढला तर शहरात दोन कोरोनाबाधित रुग्णांची आणखी भर पडली आहे. आजच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आता १४ झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी मालेगाव मधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांत नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता अधिकच वाढली आहे.

आज जिल्हा प्रशासनाला एकूण ३१ नमुन्यांचे अहवाल मिळाले. यामध्ये २८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये नाशिक शहरातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर मालेगावमधील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा एक रुग्ण चांदवड येथील असल्यामुळे आज चांदवड शहरासह पंचक्रोशीती बाजारपेठा सील करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरातील नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे तसेच निफाड चांदवड मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये ही काटेकोर पणे संचारबंदीचे पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या