Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बेझे फाट्यानजीक अपघात; तिघे गंभीर

Share

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबक तालुक्यातील वाढोली ते बेझे  फाट्यादरम्यान झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, पालघर येथील तिघे जण स्कोडा कारने प्रवास करत होते. त्यांचे कार भरधाव वेगात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. होते. कार त्र्यंबककडे जात असताना बेझे ते वाढोली दरम्यान असलेल्या अतिरुंद पुलाचा अंदाज न आल्याने  कार थेट पुलाच्या खाली कोसळली.

या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचा चेंदामेंदा झाला असून जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!