Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात कोंढव्याची पुनरावृत्ती; गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिक शहरातील गंगापूररोडवरील सोमेश्वर कॉलनीलगत असलेल्या गृहप्रकल्पामध्ये पाण्याची टाकी कोसळून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तिघेही मजूर परप्रांतीय आहेत.

या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, सातपूर शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर येथे इमारतीच्या बांधकामासाठी बांधलेली पाण्याची टाकी कोसळून तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महिला आणि पुरुष मजुरांचा समावेश आहे. आज मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

 

#नाशिक : गृहप्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून तीन परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे आणि शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे घटनास्थळी दाखल झाले आहेत#Nashik #Nasik #BreakingNews #LatestNews #Nasik pic.twitter.com/LB2hZ4uetG

त्यासाठी 15 फूट उंचीचा 2 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. आज सकाळी पाण्याचा भार जास्त झाल्याने 1 टाकी कोसळली. त्यावेळी टाकी जवळ असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्नीशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे.

मृतांची नावे 

महंमद बारीक वय 32 रा बिहार, बेबी सनबी खातून वय 28 रा बिहार यांच्यासह एक मजूर नाव समजू शकले नाही. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!