Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिककरांना दिलासा : शहरातील तीन प्रतिबंधित क्षेत्र रद्द; दैनंदिन व्यवहार होणार सुरु

नाशिककरांना दिलासा : शहरातील तीन प्रतिबंधित क्षेत्र रद्द; दैनंदिन व्यवहार होणार सुरु

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रात मनपाकडून सर्व्हे केला जात आहे. यानुसार आज १४ दिवसांचे सर्व्हेक्षण पूर्ण केलेल्या ठिकाणी मागील १४ दिवसांत एकही रुग्ण बाधित आढळून न आल्याने तीन प्रतिबंधित क्षेत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.  यामध्ये नाशिकरोड येथील धोंगडे मळा, म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्ग परिसर व सातपूरमधील संजीव नगर या तीन ठिकाणांचा समावेश आहे.

- Advertisement -

आज पर्यंत नाशिक महानगरपालिका कार्य क्षेत्रांमधील एकूण ४० रुग्ण बाधित होते. या व्यतिरिक्त परराज्यातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह होत्या. या पैकी परराज्यातील दोन्ही व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.

तसेच नाशिक शहरातील ४० रुग्णांपैकी १८ रुग्णांना आजपर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. हे रुग्ण नाशिक शहरातील नाशिक रोड, सातपूर कॉलनी, संजीव नगर, सावता नगर, मानेक्षा नगर, म्हसरूळ व जनरल वैद्य नगर येथील होते.  आयुक्तांच्या आदेशानंतर तीनही ठिकाणचे दैनंदिन व्यवहार सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या