Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

वीजतारांच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार; अंबड पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या

Share
नवीन नाशिक | प्रतिनिधी 
 
काल (दि.२९) उत्तम नगर येथे वीजतारांच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. दरम्यान, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे दोघांना जीव गमवावा लागला असा आरोप करत महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे अंबड पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण आहे.
नवीन नाशिकमधील उत्तमनगर येथील शिवपुरी चौकात झालेल्या विद्युत तारेच्या धक्क्यात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर घटनास्थळी महावितरणचे अधिकारी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे महावितरणकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना तात्काळ ४० हजारांची मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले. 
तद्नंतर महावितरणकडून या जखमींना कुठलीही मदत अद्याप मिळालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस निरीक्षकांच्या दालनासमोर ठिय्या मांडला आहे.
कालच्या घटनेप्रकरणात महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदर असून महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मोर्चातील नागरिकांनी केली आहे. अद्याप मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेले नाहीत. 
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!