Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कार झाडावर आदळून ३० वर्षीय युवकाचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Share

नाशिक । प्रतिनिधी

गंगापूर रोडवरील रस्त्याच्या मध्यभागी धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाने आज पहाटे एका तरुणाचा बळी घेतला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुन्हा एकदा रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गंगापूररोडवरील सहदेवनगर येथील अभिजीत संजय शिंदे (वय 30) हा तरुण पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घराकडे मारुती कारने जात असताना रस्त्यातील झाडाचा अंदाज न आल्याने कार झाडावर आदळली.

यात शिंदे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.  या अपघातानंतर नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यात येणारी झाडे तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे.

शहरात यापूर्वीदेखील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या झाडांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. यासंदर्भात नाशिककरांनी वारंवार आंदोलनात्मक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने झाडे तोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, काही पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध करत उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने सर्वेक्षणानुसार रस्त्यात येणारी झाडे तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यातून आंबा, वड, पिंपळ यांसारखी झाडे तोडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

दरम्यान, आजही नाशिक शहरात पेठ रोड, गंगापूर रोड तसेच चोपडा लॉन्स ते सुयोजित गार्डन या रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध आजही अनेक झाडे उभी आहेत.

पर्यावरण प्रेमींनी अपघातांची संख्या बघावी, आग्रह सोडून याठिकाणचा रस्ता मोकळा करावा अशी मागणी उद्योग जगतातून होत आहे.  आज पहाटे घडलेल्या अपघात स्थळापासून हाकेच्या अंतरावर एक वळणअसून त्याच्या समोरच भले मोठे झाड आहे. त्यामुळे अनेकदा याठिकाणी अपघात होत असतात. हा धोकादायक वृक्ष तातडीने काढण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.

मयत अभिजित शिंदे हे स्टाईसचे माजी संचालक आणि निवेकचे सदस्य संजय संपतराव शिंदे यांचे जेष्ठ सुपुत्र होते. त्यांच्या अपघाती जाण्याने उद्योग क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.


न्यायालयाच्या आदेशातूनच गंगापूर रोडवरील रस्त्याच्या मधोमध येणार्‍या 6 झाडांंना हटवण्यास मज्जाव केला आहे. ती वड, पिंपळ व मोहाची ची झाडे आहेत. यासोबतच इतर मार्गांवरही मोठ्या प्रमाणात झाडांची अडचण आहे.सातत्याने कोर्याला सहानूभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती केलेली आहे. वृक्षप्रेमींनी व मनपानेही वास्तविकतेला सामोरे जावून न्यायालयासमोर वस्तूस्तिथी मांडावी.निष्पाप लोकांचे बळी या झाडांमुळे जात आहेत.

विलास शिंदे (प्रभाग नगरसेवक व शिवसेना गटनेते)


गंगापूर रोडवरील मोठ्या प्रमाणात झाडे काढली गेली मात्र काही झाडे शिल्लक आहेत. ती धोकादायक झालेली आहेत. नवश्या गणपती मंदिराच्या त्रिफूलीवर असलेल्या वडाच्या जाडावर अनेक गाड्या आदळलेल्या आहेत. भावीक कुटूंबासह दर्शनासाठी येत असतात. त्यांनाही याठिकाणी धोक निर्माणहोत आहे. ही धोकादायक झाडे हटवण्यासाठी प्रशासनाने पूढाकार घ्यावा

राजू जाधव (अध्यक्ष नवश्या गणपती मंदीर ट्रस्ट)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!