Type to search

तिसरीही मुलगीच झाली; दहा दिवसांच्या चिमुरडीचा आईनेच दाबला गळा

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

तिसरीही मुलगीच झाली; दहा दिवसांच्या चिमुरडीचा आईनेच दाबला गळा

Share

पंचवटी | वार्ताहर

तिसरी मुलगी झाल्याने १० दिवसाच्या निरागस मुलीची सख्या आईने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली अएह. आडगाव पोलीस ठाण्यात संशयित आईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित अनुजा बाळासाहेब काळे (रा. गौरीगणेश आपरमेन्ट, वृन्दावन नगर, आडगाव शिवार) या महिलेस यापूर्वी दोन मुलीच झाल्या आहेत.

दरम्यान दहा दिवसापूर्वी प्रसूतीनंतर पुन्हा एकदा तिसरी मुलगी झाली. यामुळे अनुजा हिस नैराश्य आले होते. त्यानंतर अनुजा हिचे पती बाबासाहेब हरिभाऊ काळे हे (दि.३१) रोजी सकाळी ८.३० वाजता पत्नी अनुजा हिच्या मावसभावाच्या लग्नासाठी शिंगवे, कोपरगाव याठिकाणी गेले होते.

तेव्हा घरी पत्नी अनुजा, आई, मुलगी आराध्या, आयुजा, १० दिवसांची पियू असे घरी होते. सायंकाळी ५.३० वाजता बाबासाहेब काळे यांना त्यांची मुलगी आराध्या हिने फोन करून पियू निपचित पडली असून ती उठत नाही असे सांगितले.

आई रडत असल्याने आजी पियूला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. दरम्यानच्या काळात हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने बाळासाहेब काळे यांनी मयत पियूचे शवविच्छेदन करण्याबाबत आग्रह धरला.

यात देखील पियूचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब लक्षात आली. त्यानंतर आडगाव पोलिसांनी देखील पियूची आई अनुजा हिची कसून चौकशी केली.

तिसऱ्यांदा देखील मुलगीच झाल्याने पियूचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली तिने दिली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!