Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमधून ‘या’ गाड्या रद्द; ‘या’ माघारी

Share

नाशिक | प्रतिनिधी  

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला असून रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मनमाड नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने शहरात सुट्टी जाहीर केल्यानंतर अनेक नागरिकांनी मुंबईला जाणे टाळले आहे. तर अनेक गाड्या मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी आणि देवळाली कॅम्प परिसरात थांबविण्यात आल्या आहेत.

मनमाड येथून मुंबईला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.  त्यामुळे चाकरमान्यांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागली तर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असल्याचे समजते. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

मनमाड-उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा,जळगाव आदी रेल्वे स्थानकावर खोळंबा आहे. गाड्या कधी पुढे सरकतील याबाबत अनिश्चितता असून अनेकांनी आज मुंबईच्या पावसामुळे सुट्टी घेतली आहे.

मुंबईत मध्ये रेल्वेची सीएसमटी-ठाणे सेवा, तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी भरले असून रेल्वे रूळ पाण्याखाली बुडाले आहेत.

यामुळे ठिकठिकाणी अनेक गाड्या खोळंबल्या असून अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असून एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, वेधशाळेने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला असून, गरज असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

या गाड्या झाल्या रद्द

रत्नागिरी दादर एक्सप्रेस (५०१०४/५०१०३), राज्यराणी एक्सप्रेस (२२१०२/२२१०१), मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस(१२१२७/१२१२८), नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस(१७६१७/१७६१८), मनमाड-एलटीटी एक्सप्रेस(१२११८/१२११७), मुंबई-गडग एक्सप्रेस (१११३९), मुंबई-गडग एक्सप्रेस(१११४०), पंचवटी एक्सप्रेस (१२११०/१२१०९), सिंहगड एक्सप्रेस(११०१०/११००९), डेक्कन एक्सप्रेस(१२१२४/१२१२३), सह्याद्री एक्सप्रेस(११०२३)

इतरत्र थांबविण्यात आलेल्या गाड्या

नागपुर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११४०२ (नाशिकरोड), हुबळी-एलटीटी एक्सप्रेस १७३१७ (पुणे), मडगांव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस १०११२( पनवेल), महालक्ष्मी एक्सप्रेस १७३१२(पुणे), विशाखापट्टणम् १८५१९(पुणे), सिद्देश्वर एक्सप्रेस १२११६(दौंड), गडग-मुंबई १११४०(पुणे), टाटानगर-मुंबई २२८८६(ईगतपुरी), अमरावती-मुंबई १२११२(देवळाली), सह्याद्री एक्सप्रेस११०२४(सातारा), भुवनेश्वर-मुंबई ११०२०(कामशेत), कन्याकुमारी-मुंबई १६३८२(तळेगाव-पुणे), हैद्राबाद-मुंबई १२७०२(पुणे), चेन्नई-मुंबई १२१६४(पुणे), पौन्डेचेरी-दादर ११००६( पुणे), लातुर-मुंबई २२१०८(दौंड).

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!