मनपाची आता थर्माकॉल जप्ती मोहीम; व्यावसायिकांना दंड

0
नवीन नाशिक | गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र सजावटीची दुकानं फुलली असून अनेक गणेशभक्तांनी बाजारात वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी गर्दी केली आहे.

असे असतानाच नाशिक मनपाने थर्माकॉलचे साहित्य विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा धडाका लावला असून नवीन नाशिकमध्ये अनेक दुकानदारांना दंड ठोठावला आहे.

नाशिक शहरातील एमजीरोड, रविवार कारंजा, मेनरोड परिसरात सर्रास थर्माकॉल विक्री होत आहे. याठिकाणीदेखील मनपाने जप्तीची कारवाई करावी अशी मागणी इतर भागातील व्यावसायिक करत आहेत.

LEAVE A REPLY

*