बेळगाव ढगा येथील महिलांच्या मृत्यूचे हे आहे खरे कारण

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. १४ : गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प झालेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे काल एकाच  कुटुंबातील चार महिलांचा बळी गेल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या त्र्यंबक आणि नाशिक जवळील या गावात आजही गावकऱ्यांना पाण्यासाठी झगडावे लागत असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी पाणीपुरवठा योजनाच ठप्प पडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे, याकडे ‘आप’के लक्ष वेधले आहे.

एकीकडे प्रशासनाकडून पाण्याची सोय नसताना दुसरीकडे येथील अनेक गावकऱ्यांनी स्व:खर्चाने हजारो रुपये खर्चून बोअरवेलच्या मार्फत पाण्याची सोय केली आहे.

या संदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल येथील शिंदे कुटुंबात गणपतीसाठी सातपूर येथे राहणारे कुटुंबातील काही सदस्य एकत्र जमले होते. मात्र सदस्यांची संख्या वाढल्याने आंघोळीसाठी आणि धुण्या-भांड्यासाठी पाणी कमी पडले.

त्यामुळे घरातील महिलांनी जवळच असलेल्या पाझर तलावात धुणी भांडी उरकली. हा पाझर तलाव गावाच्या आडबाजूला असल्याने या महिलांनी आंघोळीही तिथेच उरकायचे ठरविले.

मात्र पाण्यात तलावाच्या काठावर असलेल्या शेवाळाने आणि तलावात असलेल्या गाळाने सौ.मनिषा अरुण शिंदे (वय ४५), कु ऋतुजा अरुण शिंदे (१६), कु. वृषाली अरुण शिंदे, (२१), आरती निलेश शिंदे (२४) यांचा बळी घेतला. यांच्यातील एकीचा शेवाळावरुन पाय घसरला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना इतर तिघींचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला. आई दोन मुली आणि सून अशा चौघींना कुटुंबाने गमावले.‍

दरम्यान या प्रकारानंतर पाणीपुरवठा योजना, त्यातील भ्रष्टाचाराची आता गावात गांभिर्याने चर्चा सुरू असून गावकरी आता संताप व्यक्त करत आहेत.

आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद भावे म्हणाले, की व्यवस्था परिवतर्नाशिवाय या देशात कोणतेच प्रश्न मुळापासून सुटू शकत नाही. पाझर तलाव बांधताना तिथे मानवी सुरक्षेसाठी कोणत्याच उपाय केलेल्या दिसत नाही, त्यामुळेच या चार निरपराध महिलांना जीव गमवावा लागला आहे.

अशा पाझर तलावांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ असून लोकांनी अशा ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. आगामी गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमीवरही लोकांनी काळजी घेण्याचे आवाहनही भावे यांनी केले.

LEAVE A REPLY

*