Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खाऊचे पैसे दिले पूरग्रस्तांना; तेजस्वी, चैतन्यचे सर्वत्र कौतुक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

लहान पण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,

ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मारा…

लहानपण सर्वांनाच हवं असत…लहान मुलं असतातच मुळी निरागस, त्यांचे विचार आणि प्रश्न देखील निरागासच असतात. सांगली सातारा आणि कोल्हापुरात पुराने थैमान घातल्यानंतर इथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक भागातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. असे असताना नाशिकच्या सिडको  येथील वैभव देवरे दाम्पत्याच्या दोन्ही मुलांनी वर्षभर जमवलेले खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी दिल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चेतना नगर येथील वैभव व सोनल देवरे यांची ११ वर्षीय मुलगी तेजस्वी व ६ वर्षीय मुलगा शाहू यांनी त्यांचे खाऊचे पैसे पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांचा खाऊच्या पैशांचा डब्बा घेऊन आईवडील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या कार्यालयात ते पोहोचले.

दोन्ही मुलांनी आम्ही आपले खाऊचे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दोघांचाही आनंद झाला, त्यांनी दोघांना जवळ घेत एवढ्या लहान वयात त्यांच्या सेवाभावी वृत्तीबाबत आनंद व्यक्त केला.

यावेळी ही मुलं म्हणाली, टीव्हीवर पावसात भिजणारे आमच्यासारखी व आमच्या पेक्षाही लहान भावंडे बघून खूप वाईट वाटले. पूर ओसरल्यावर ते शाळेत कसे जातील? त्यांना तर आता दप्तर, पुस्तक, वह्या सर्व नवीन घ्यावं लागेल, आता ते रक्षाबंधन कसे साजरे करतील?  असे अनेक प्रश्न पडत होते.

पूरग्रस्तांना आम्ही खाऊचे पैसे त्यांच्यासाठी देऊ शकतो का? असा प्रश्न आई वडिलांना विचारला. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी कुठलाही उशीर न करता जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आमची इच्छा पूर्ण केली असे तेजस्वी हिने देशदूतशी बोलताना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!