Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

#NashikTalent : नाशिकच्या वरूणला दहावीत ९६ टक्के, बुद्धिबळात मिळवले सव्वा लाखांचे बक्षीस

Share

जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे), अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने मुंबई येथे 13 ते 16 जुन दरम्यान आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फिडे 1600 रेटिंग खालील खेळाडूंसाठी नाशिकच्या वरुण संजय वाघ याने दिमाखदार व सुंदर खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

वरुणची  आंतरराष्ट्रीय एलो रेटिंग 1565 आहे. शेवटच्या व निर्णायक फेरीत त्याने श्रीलंकेच्या जी जुडेडोरीसन याच्याशी डाव बरोबरीत सोडविला.

वरुणला 1 लाख 20 हजारांचे रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  नाशिकचा सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराती नंतर एवढी मोठी रक्कम जिंकणारा पहिलाच बुद्धिबळ खेळाडू ठरला आहे.

या स्पर्धेत भारतासह श्रीलंकेसह भारतातील एकूण 396 खेळाडूंचा सहभाग होता.  त्यापैकी 274 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू होते. यावरून स्पर्धेच्या काठिण्य पातळीचा व बुद्धिबळपट्टूच्या कौशल्याचा अंदाज येतो. वरुणने 10 सामन्यात 8 गुण वसूल केले. त्यात सात सामन्यात विजय, एका सामन्यात पराजय व दोन सामना त्याने बरोबरीत सोडवले.

वरुणला नाशिकचे पहिले कॅन्डीडेट मास्टर व सुवर्णपदक प्राप्त्त राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक विनोद भागवत व मोरफी चेस अकादमीचे सहकार्य लाभले.

वरुणला दहावीत 96% गुण

वरुणने या वर्षी फ्रावशी अकादमीत शिक्षण घेवून दहावीची परीक्षा देत 96% गुण संपादन केले. मागील वर्षी याच स्पर्धेत त्याने सातवा क्रमांक मिळविला होता. परंतु विजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले होते. वर्षभर शाळेचा अभ्यास करता करता त्याने सातत्यपूर्ण सराव चालू ठेवला व यावर्षी अजिंक्यपदाचा मान पटकाविला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!