सुरगाणा तालुक्यातील बोरगाव-खेरुडे रस्त्याची दुरवस्था

0

ठाणापाडा (वार्ताहर) ता. २२ :  सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खेरूडे सुकापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.

बोरगाव येथील आर.टी.ओ हे नागझरीफाटा येथे हलवण्यात आल्याने व बोरगाव सुकापूर अभोणा मार्गे जाणारी ओव्हरलोड वाहने या आडमाप मार्गे रवाना होत असतात. त्यामुळेही रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

बोरगाव-अभोणा हा मुख्य रस्ता एकेरी असल्याने दोन वाहने जाण्यातही अडचण निर्माण होते. त्यामुळे या भागात लहान-मोठे अपघात होत असतात.

कळवण विभागातील रस्त्यांचे काम सां.बाने पूर्ण केले असून सुरगाणा विभागाकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडूजी झाली नाही, तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी येथील वाहनचालक करत आहेत.

LEAVE A REPLY

*