Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : राज्य उत्पादनच्या भरारी पथकावर मद्य तस्करांचा हल्ला; मध्यरात्री सिनेस्टाईल थरार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राज्य उत्पादन शुल्कच्या दिंडोरी भरारी पथकावर आज पहाटेच्या सुमारास १५ ते १८ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत राज्य उत्पादनचे कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण गावालगत त्रीफुली रोड व सुरगाणा शहरातील मानी चौफुलीजवळ  ही घटना घडली. या हल्ल्यात लोखंडी, रॉड, लाठ्या काठ्यांचा वापर झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरेश बाबू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल (दि. ०४) रात्री दहाच्या सुमारास राज्य उत्पादनच्या पथकास चोरटी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिंडोरी पथक याठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले होते.

रात्री दीड वाजेच्यास सुमारास एक पिक अप वाहन संशयितरित्या आढळले. पथकाने चौकशी केली असता पिकअप मधील संशयितांनी गाडी सोडून पोबारा केला. दरम्यान, त्यांचा पाठलाग केला असता, पुढे एका एक्सयुव्ही कारमध्ये त्यांनी बसून पळ काढला. त्यांचा पाठलाग करत असताना रस्त्यावर दोन चारचाकी संशयितरित्या आढळल्या होत्या. या वाहनांची चौकशी करण्यासाठी पथक थांबले असता या संशयितांनी भरधाव एक्सयुव्ही वाहनातून ते पसार झाले.

दरम्यान, उंबरठाणकडून हे पथक सुरगाणाकडे येत असताना त्यांचा पाठलाग तीन मोटारसायकलस्वारांनी केला. पुढे सुरगाणा शहरालगत आल्यानंतर मानी चौफुलीजवळ  एक स्विफ्ट कार उभी होती. तिथे १० ते १५ संशयित उभे दिसले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या होत्या, त्यांना राज्य उत्पादनचे कर्मचारी असल्याचे सांगत असतानाही त्यांनी वाहनाचे नुकसान केले तसेच पथकातील अधिकाऱ्यांवर लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला.

या घटनेत राज्य उत्पादनच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अधिक तपास सुरगाणा पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

अशी घडली घटना

रात्री दहा वाजता माहिती मिळाली : राज्यात बंदी असलेले मद्य घेऊन एक पिक अप आणि एक्सयुव्ही पेठ मार्गे उंबरठाण बर्डीपाडा कडे येत आहेत.

राज्य उत्पादनचे कर्मचारी महेश आनंदराव खामकर, विजय पाटील, विष्णू रामदास सानप, सोमनाथ मारुती भांगरे व दोन पंच नवनाथ सावळीराम ढगे व महेश काकड यांनी सविस्तर माहिती दिली.

यानंतर संशयित वाहनांच्या शोधात टाटा सुमो एमएच १५  एफटी ०५७३ ने निघालो. सोबत पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, बदामी रंगाची लॉगोन कारही होती.

पावणेअकरा  वाजता दिंडोरी येथील निघून उंबराळे मार्गे ननाशी जोगमोडी गावाजवळ आलो.

रात्री दीड वाजता एक महिंद्र पिक अप क्रमांक एमएच २५, पी ९०९० हि समोरून आली असता या वाहनास अडवले.

दरम्यान, संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळाले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात दमनमधील मद्य आढळून आले.

यानंतर याठिकाणी एक एक्सयुव्ही कार पिकअप च्या पुढे गेली. तिथे थांबून पिकमधील दोघे संशयित या वाहनात बसून उंबरठाणकडे पळाले. या गाडीचा माग काढून तिचा पाठलाग पथकाने केला. इतर दोघांनी संशयित पिक ताब्यात घेऊन दिंडोरीकडे रवाना केला.

पुढे उंबरठाणकडे निघालेली एक्सयुव्हीचा पाठलाग करण्यासाठी आम्ही उंबरठाण पासून चार किमी अंतरावर आलो.

दरम्यान, याठिकाणी एक इंडिका व एक पिकअप संशयित आढळून आल्याने तिथे आम्ही चौकशी केली, दरम्यान यात जनावरे असल्याचे आढळून आले. तिथून आम्ही दोन किमी पुढे गेलो मात्र सुगावा न लागल्याने लागलीच मागे फिरलो.

तेव्हा उंबरठाण येथे आल्यानंतर रात्रीच्या तीन वाजता गावातील त्रीफुली रोडवर तीन जण लोखंडी रॉड, व काठ्या घेऊन उभे होते.

या संशयितांनी स्विफ्ट कारवर गज मारल्याने काच फुटली. दरम्यान, धोका बघून आम्ही सुरगाणकडे येत राहिलो. तेव्हा तीन दुचाकीस्वरांनी आमच्या गाडीचा पाठलाग करत होत्या. सुरगाणा येथे आलो असता पहाटे चारच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट करा उभी होती येथे उभ्या असलेल्या १०-१५ जणांच्या टोळक्याने  आमच्यावर हल्ला केला. त्यांना आम्ही ओळखपत्र दाखवत होतो मात्र संशयितांनी कुठलीही तमा न बाळगता हल्ला करून गंभीर जखमी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!