Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक

तब्बल वीस वर्षांनी झाली ‘त्यांची’ भेट; शिक्षकांचा आदर, धास्ती आज दिसत नसल्याची खंत

Share

भऊर : (बाबा पवार) | सेवानिवृत्त होऊन अनेक वर्षे झाली आणि अचानक फोन आला ‘सर तुमचा वेळ हवा आहे, तुमचा सत्कार आयोजित केला आहे. या गोष्टींने मन भरून आले. तुमचा सर्व वर्गाच आठवला. सर्वांची त्यावेळची चेहरे आठवली. आता कशी दिसत असतील…काय चालल असेल आपल्या मुलांचं? कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अशी भावना सेवानिवृत्त शिक्षक रौंदळ व वाय. आर. पवार यांनी व्यक्त केली.

देवळा तालुक्यातील श्री. सिद्धेश्वर विद्यालय भऊर विद्यालयातील ​सन १९९७/९८ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा नुकताच पार पडला. विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेला आली. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. त्यावेळी शिक्षकही तसेच होते. गावात दिसून आले तरी विद्यार्थी गडप व्हायचे. आज समोर शिक्षक असतील तरी विद्यार्थी राजरोसपणे वागतात. आजच्या विद्यार्थी मेळाव्यात सर्वांनीच यावर चर्चा करत खंत व्यक्त केली.

जुन्या आठवणींच्या उजाळा देत चर्चा व हास्यकल्लोळाने (दि.११) पुन्हा एकदा लहानपणीच्या मित्रांशी गप्पा टप्पा चेष्टा मस्करी, टोपण नावांची आठवण करून देत हा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी महेश पाटील यांनी केले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण घडवलेले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात आपले भविष्य घडवत असतांना त्यांना अचानक ज्या शिक्षकांनी घडवले त्यांची आठवण येणे हीच तर खरी गुरूदक्षणा आहे. ‘सर तुमचा वेळ हवा आहे…तुमचा सत्कार आयोजित केला आहे.. या कानावर पडलेल्या शब्दांनी शिक्षकांचे मन भरून गेले.

या शब्दात आपल्या भावना सेवानिवृत्त शिक्षक पवार व रौंदळ या शिक्षकांनी व्यक्त केली. तुम्ही सर्व स्वतःचे भविष्य तर नक्कीच उज्वल करणार यात शंका नाही, मात्र ज्या समाजाने आपल्याला घडवले त्या समाजासाठीही एकत्रित येऊन चांगले कार्य करावे असे मत वाय. आर. पवार व निशिकांत बागुल या शिक्षकांनी प्रसंगी व्यक्त केले.

माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक विचारांची देवाण-घेवाण व्हावी, ज्यांनी आपल्याला घडवले त्या शिक्षकांचा सन्मान करावा असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे माजी विद्यार्थी महेश पाटील यांनी सांगितले. नितीन पवार, प्रभाकर आहेर, मोहन माळी, जितू आहेर यांनी शिक्षकांच्या व विद्यालयातील मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. तर देविदास आहेर यांनी छान कविता सादर केली. नारायण पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी देविदास पवार, शरद पवार, दिपक पवार, राजेश देवरे, शरद पवार, रविंद्र पवार, जिभाऊ पवार, बाजीराव पवार, दिनकर पगार, जगन्नाथ निकम, राजेंद्र पवार, गिरीश देवरे, जितेंद्र महाजन, राजेंद्र जाधव, बापू गरुड, मोहन माळी, खंडू वाघ, कडू चव्हाण, नितीन सूर्यवंशी, राहुल पवार, गणेश पगार, कुमुदिनी पवार, हेमंत पवार, सुभाष पगार, पंडित जाधव, निशिकांत पवार इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!