Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्मार्ट हायब्रीड कार’ची निर्मिती

Share

अल्कहोल आणि स्मोक डिटेक्टरव्दारे चालकावर ठेवणार नियंत्रण, विद्युत आणि सोलर चालते, जीपीएस सिस्टमवर कार्यरत

नाशिक | प्रतिनिधी

सध्या इलेक्ट्रिक कार्स बाजारात उपलब्ध झाल्या असल्या तरीही सोलर आणि इलेक्ट्रिक दोन्हींचा उपयोग करून स्मार्ट सिस्टम जसे जीपीएस, अल्कोहॉल डिटेक्कर, स्मोक डिटेक्टर की, व्यसनी ड्रायव्हरवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल, सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा काळ आहे.  हाच बदलता काळ अनुभवत नाशिकमधील संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मानवाशी संबंधित सोयीसुविधांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोड देत अनोख्या  कारची निर्मिती केली आहे.

संघवी कॉलेजच्या विशाल पवार, आकाश वाघचौरे, आकाश सत्रे , आनंद शिंदे, शिवम बडगुजर, गणेश कडाळे, प्रथमेश अरबूज व हीत शाह या आठ विद्यार्थ्यांनी सात महिने परिश्रम करून या स्मार्ट हायब्रीड कारची निर्मिती केली आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे या कारला ऍक्सिडेंटल सेन्सर बसविण्यात आला आहे. त्यामुळे अपघात होताच कारच्या सर्व्हिस सेंटरला अथवा ड्रॉयव्हरच्या परिजनांना अपघाताबद्दल त्वरीत एसएमएस जातॊ.

जवळच्या हॉस्पिटल व नातेवाईकांना कॉलही जातो. कार बंद पडल्यास कारच्या सर्व्हिस सेंटरला त्वरीत एसएमएस जातॊ. अश्या प्रकारच्या सुविधा असलेल्या कार्स अजून बाजारात आलेल्या नाहीत. मात्र, हे तंत्रज्ञात आगामी काळात अविष्कार घडवू शकते असेच काही या विद्यार्थ्यांना वाटते.

ही कार एकदा चार्ज केल्यावर बॅटरी बॅकअप वर कार एका तासात किमान ५० किलोमीटर चालते तर सोलर एनर्जीवर एका तासात ७० किलोमीटर धावते. कारचा टॉप स्पीड ४५ केएमपीएच असून चार्जिंग साठी अवघे दोन तास पुरेसे असतात असे हे विद्यार्थी सांगतात.

विद्यार्थ्यांना या कारसाठी एक लाख १० हजार रुपये इतका खर्च आला आहे. श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्थ श्री राहुल संघवी आणि समन्वयिका तसेच अधिष्ठता डॉ. प्रियंका झंवर यांच्या हस्ते सदर “इलेक्ट्रिक हायब्रीड अँड स्मार्ट व्हेहिकल” चा उदघाटन तसेच लॉन्च सोहळा पार पडला.

यावेळी  कॉलेजचे  प्राचार्य नवनाथ पाळदे, मार्गदर्शक तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख प्रा. पल्लवी बागुल आणि प्रा. राहुल बनकर, तसेच महाविद्यालय तसेच इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभागाचे सर्व शिक्षक विद्यार्थी  यावेळी उपस्थित होते.

कारला कोणतेही इंधन लागत नसून, शून्य उत्सर्जन होते तर प्रदूषणावर नियंत्रण आणि  ग्लोबल वार्मिंगवर पर्याय म्हणून अश्या कारचा वापर वाढला पाहिजे,  रिनेव्हेबल एनर्जी म्हणजेच नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत कारसाठी वापरले गेले असून भविष्यात या कार्ल आयसी इंजिन जोडता येऊ शकते तसेच जास्त प्रवासीही बसवता येवू शकतील आणि वस्तू वाहक म्हणूनही तिचा उपयोग होऊ शकतो असे यावेळी मार्गदर्शक बनकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार संशोधन गटाला ‘टिम फॉक्सट्रॉट’ नाव दिले असून त्यांना मावेन्टेक पॉवर फॉरेव्हर, इलेक्ट्रोअर्क इंजिनिअरिंग सोल्युशन अँड कॅड सेंटर आणि  निलराज इंडस्ट्रीज कडून सदर कार निर्मितीसाठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!