Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुलांना अस्वस्थ वाटू लागल्याने ७४ विद्यार्थी सिव्हीलमध्ये दाखल

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील बोरगड येथील एका नामांकित शाळेतील तब्बल ७४ विद्यार्थ्यांना एलर्जी झाल्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले.

अधिक माहिती अशी की, नाशिक पेठ रोडवर बोरगड शिवारात न्यू ग्रेस अकॅडमी शाळा आहे. आज सकाळी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगाला खाज आली होती. एक-एक करत ७४ विद्यार्थ्यांना असा त्रास होऊ लागला. दरम्यान,  शाळा व्यवस्थापनाने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा आहार देत नसल्याने खळबळ याठिकाणी उडाली होती.

मुलांच्या पालकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात पालकांनी मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले आहे. कीटक चावल्याने विद्यार्थ्यांना एलर्जी झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!