त्रिमूर्ती चौकातील कौस्तुभ ठरला सोशल मीडियाचा बळी

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) ता. १२ : सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो याची प्रचिती आज नवीन नाशिकमध्ये आली.

दहावीची परीक्षा दिलेल्या त्रिमुर्ती चौक येथील कौस्तुभ कालिदास मुंगेकर ( वय १५ वर्षे) या विद्यार्थ्याने नापास होण्याच्या धास्तीने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमवारी दहावीचा निकाल असल्याचा खोटा संदेश सोशल मीडियातून गेले दोन दिवस फिरत होता. कौस्तुभने त्यावर विश्वास ठेवून निकालाचा धसका घेतला.

त्यामुळे आपण नापास होऊ या भीतीतून त्याने कथित निकालापूर्वीच स्वत:ला संपविले.

दरम्यान तो सोशल मीडियाचा बळी ठरल्याची परिसरात चर्चा असून या अफवांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*