Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जमीनीचे लिलाव थांबवा, कांदा अनुदान त्वरीत दया

Share

नाशिक । प्रतिनिधी

दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला असताना जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांच्या जमिनी लिलाव केल्या जात आहे. ही लिलाव प्रक्रिया त्वरीत थांबवावी व कांदा अनुदान त्वरीत दयावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा.राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासह त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेत चर्चा करुन निवेदन दिले.

बळीराजा आधीच दुष्काळाने त्रस्त असून, शेतीमालाला भावही मिळत नाही. शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहेे. या बिकट परिस्थितीत शासनाकडून जमा झालेले अनुदान बँका परस्पर वळवून कर्ज वसूल करत आहे. बँकांनी अनुदानाच्या रक्कमेतून कर्ज वसूल करु नये असे स्पष्ट आदेश शासनाने दिले होते.

मात्र, तरी देखील जिल्हा बँक नोटीस धाडून शेतकर्‍यांच्या जमिनीचे लिलाव करत आहे. बँकांची ही मनमानी चुकीची असून शेतकर्‍यांच्या मालमत्ता लिलाव करु नये. अशी विनंती राजू शेट्टीसह शेतकरी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे केली. त्यावर खेडकर यांनी जिल्हाधिकार्‍यांनी यापुर्वीच बँकेला पत्र देत मालमत्ता लिवावाची प्रक्रीया स्थगित करावी.

असे आदेशित केले असल्याचे सांगितले. तसेच दुष्काळाचे 287 कोटी रुपयांचे अनुदानाही वितरीत झाले असून, 17 मंडळांचे 75 कोटींचे अनुदान देणे बाकी असून शासनाकडून ते प्राप्त करुन घेण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!