Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ‘समृद्धी’च्या ब्लास्टिंगने उडाला दगड; पत्रा फोडून घरातल्या कॉटमधून गेला आरपार; परिसरात भीती

Share

सिन्नर | अजित देसाई 

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वावीजवळील दुशिंगवाडी येथे खाणीचे खोदकाम सुरू आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ब्लास्टिंग मुळे उडालेला 5 किलो वजनाचा दगड सुमारे 2000 फुटांवरील घराचा पत्रा तोडून थेट आत शिरला. या दगडाच्या आघाताने घरातील गादीला छिद्र पडून तो दगड कॉटच्या आरपार भेदून बाहेर पडला.

येथील मोहन जयवंत घोटेकर यांच्या वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला. खाणीसाठीच्या ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड परिसरात उंचावरून नेहमीच पडत असतात.

याशिवाय स्फोटाच्या आवाजाने प्रचंड हादरे बसतात, जनावरे व पाळीव पक्षांना देखील यामुळे इजा पोहोचते अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!