नाशिकमधील आदिवासी बहुल भागात ‘स्टाँबेरी’विक्रीतून ‘नवसंजीवनी’

0

ठाणापाडा । वार्ताहर

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण तालुक्यातील आदिवासी बहुल भागात घाटमाथ्यावर लालभडक आंबटगोड अशी स्टाँबेरीचे उत्पादन अलीकडे वाढले आहे. वणी व सापुतारा, बोरगाव, चिखली, सराड, हतगड, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेताच्या बांधाच्या काठावर स्टाँबेरीची विक्री करून मोठा रोजगार आदिवासी युवकांना उपलब्ध झाला आहे.

ताजी ताजी स्टाँबेरीची विकत घेण्यासाठी महाराष्ट्र गुजरात सीमेवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून स्टाँबेरी खरेदी केली जाते. यातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होत असून चालत्या वाहनात विक्री करून भावही मिळतो आहे. त्यामुळे मोबदलाही अधिक मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगतात. आदिवासी युवकांनी याठिकाणी स्टाँबेरी विक्रीसाठी उच्च दर्जाचे पकिंगचेदेखील ज्ञान आत्मसात केले आहे. त्यामुळे मोठी उलाढाल येथून दररोज होताना दिसून येत आहे.

परिसरातील अनेक मोठे शेतकरी किरकोळ बाजारात विक्री न करता मोठ्या बाजारपेठांना टार्गेट करून तिथेही माल पाठवत आहेत.  त्यामुळे महाबळेश्वरनंतर कळवण सुरगण्यात स्टाँबेरीची मोठी बाजारपेठ निर्माण होताना दिसून येत आहे. या परिसरातील मोठे शेतकरी त्यांच्या शेतातील माल नवसारी, बारडोली, सुरत अशा मोठ्या सरदार मार्केट सुरत येथे माल पाठवत आहेत.

गेल्या आठवड्यापासुन गुलाबी हुडहुडी थंडीच्या प्रमाण वाढला असल्याने मात्र थोडक्यात प्रमाणात फडका बसला होता. मात्र, थंडी कमी झाल्यामुळे पुन्हा या व्यवसायाने उभारी घेतली आहे.

आदिवासी शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढत आहे. सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील घोडांबे, नागशेवडी, पोहाळी, शिदें, सराड लिंगामा, साजोळे, बोरगाव, हिरीडपाडा आदी भागात तर कळवण तालुक्यात पळसदरचे खोरे, सुकापुर, देवळीकराड खेरूडे, बोरदैवत, वडपाडा, आदी गावातील आदिवासी शेतकरी भात, नागली, मका, दादर, गहू, आदी पारंपरिक पध्दतीने फिकांसह आता स्टाँबेरीच्या शेतीकडे हे शेतकरी वळलेली दिसून येतात.

तसेच या परिसरात स्टाँबेरीच्या पिकासांठी पोषक अनुकूल थंड वातावरण, जमिनीच्या काळीभोर पोत असल्यामुळे सात आठ वर्षांपासून स्टाँबेरी लागवडीची आवड निर्माण झाली. खरोखरचं संपूर्ण घाटमाथ्यावर स्टाँबेरी शेती होत असल्याने महाबळेश्वर सारखे सुरगाणा तालुक्या काही दिवसांनी प्रसिद्ध होईल असेही अनेकांकडून म्हटले जात आहे.

सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरीची अहमदाबादकरांना भुरळ

LEAVE A REPLY

*