Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण; निवडणुकीमुळे दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयाला स्थगिती 

Share
नाशिक । प्रतिनिधी 
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच दिवाळीचा सण घातला आहे. दिवाळीच्या सणासाठी दि. २४ ऑक्टोबरपूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला होता. मात्र लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने वित्त विभागाला आगाऊ पगार करणे शक्य होणार नसल्याचे कारण देत दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पेन्शनधारकांसह सरकरी, निमसरकारी विभाग, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, शैक्षणीक संस्था, कृषी विद्यापीठांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. वरील आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार असल्याचे सरकारने सांगितले होते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात होणार असे चित्र होते. सरकारी कर्मचाऱ्यांना साधारणपणे १ तारखेला पगार दिला जातो.
मात्र यावर्षी दिवाळी महिनाअखेरीस म्हणजे २५ तारखेला असल्याने लवकर पगार दिले जाणार होते. दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी नको, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिवाळीपूर्वी आठ दिवस अगोदरच पगार निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची पगारपत्रके बनवणाऱ्या वित्त विभागातील कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत जुंपलेले असल्याने दिवाळी पूर्वी आणि १ तारखेच्या अगोदर देखील पगाराची प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य असल्याचे कारण देत पगार पुढे ढकलण्यात आले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी काटकसरीची होणार असून त्याचा थेट फटका बाजारपेठेवर देखील बसणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दिवाळीपूर्वी पगार करण्याच्या घोषणेवर घुमजाव करण्यात आल्याने सरकारप्रती या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!