Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कृ. उ. बा. सभापती शिवाजी चुंबळेंना राज्य उत्पादनकडून अटक; विदेशी मद्यसाठा भोवणार

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांना आज नाशिक जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या जामिनावर मुक्तता केली जाणार होती. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विदेशी मद्यसाठा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

चुंबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या घराची तब्बल १६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी केली. यामध्ये जवळपास सव्वापाच लाखांचे विदेशी मद्य, २२ तोळे सोनं तसेच १ किलोपेक्षा अधिक चांदी असा मुद्देमाल मिळून आला होता.

दरम्यान, सव्वापाच लाखांचे मद्य भारतीय लष्कराच्या कोट्यातील असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून हे मद्य बनावट आहे की अस्सल आहे याबाबत माहिती समोर येणार आहे.

जवानांना मिळणाऱ्या या मद्यासाठी ठराविक मर्यादा असतात त्यामुळे वरील दोन्हीही शक्यता असल्या तरी चुंबळे गोत्यात अडकण्याची शक्यता अधिक आहे. बनावट असले तर ते कुठून आले? अस्सल असेल तर ते त्यांच्याकडे कसे आले? याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी करत असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरु होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!