Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे; घोषणेची औपचारिकता बाकी

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून उद्धव निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्या पीठासन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी अधिकृत घोषणा करतील.

उद्या (दि. १८) नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आहे. भाजपचे स्थायी समितीत १६ पैकी ०९ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपचाच सभापती विराजमान होणार असून कोणाची याठिकाणी वर्णी लागेल हे अखेरच्या दिवसापर्यंत गुलदस्त्यात होते.

अखेर, उद्धव निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सभापतिपदासाठी गणेश गिते यांच्या नावाची सुरुवातीला चर्चा होती, मात्र उद्धव निमसे आणि स्वाती भामरे यांचेही अर्ज दाखल झाल्यामुळे पक्षातच चुरस वाढली होती.

सकाळपासून महापालिकेत याबाबत तर्क वितर्कांना उधान आले होते. दरम्यान, सायंकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होऊन निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!