Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जेष्ठांना एसटीकडून ‘स्मार्ट पास’; वर्षभरात करता येणार ४ हजार किमी ‘मोफत प्रवास’

Share
सिन्नर । अजित देसाई  
राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाकडून वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी यापुढे वार्षिक मोफत प्रवास पास देण्यात येणार आहे. सध्या जेष्ठांसाठी एसटी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. मात्र नव्या निर्णयानुसार ४ हजार किमी मोफत प्रवास जेष्ठाना करता येणार असून सध्या सवलतीच्या प्रवासासाठी ग्राह्य असणारी आधार कार्ड व इतर ओळखपत्रे टप्प्याटप्प्याने हद्दपार होणार आहेत.
बदलत्या काळासोबत एसटीने देखील आधुनिकता आणली असून वाचकांसाठी डोकेदुखी ठरणारी जुनी तिकीट व्यवस्था बंद करून स्मार्ट यंत्रांच्या सहाय्याने प्रवाशांना त्यांनी चुकत्या केलेल्या प्रवासीभाड्याचे मूल्यांकन असणारे तिकीट देण्याची व्यवस्था केली आहे. प्रवाशांसाठी एसटीकडून अनेक सवलती देण्यात येतात. विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना प्रवास भाड्यात सवलत असल्याने ते एसटीचे नियमित या हक्काचे ग्राहक आहेत. या कायम ग्राहकांसाठी आता स्मार्ट पास वितरित करण्यात येणार असून कॅशलेस प्रवास योजनेतून या ग्राहकांना सवलत दिली जाणार आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी असणारी अर्ध्या दरातील प्रवास भाड्याची योजना आता बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याजागी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना स्मार्ट पासच्या माध्यमातून वर्षभरात ४ हजार किमी अंतर मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व मासिक पासधारक प्रवाशांसाठी देखील याच प्रकारचा पास असणार आहे. या पास वर सदर पासधारकाचा फोटो व नाव असणार आहे.
प्रवासी म्हणून असणारी श्रेणी देखील त्यात नमूद करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांसाठी या या पासमध्ये असणाऱ्या मायक्रो चिपवर वर्षभरासाठी चार किमी अंतराचा रिचार्ज करण्यात येईल. तर विद्यार्थि व नियमित पासधारकांसाठी त्यांचा प्रवासमार्ग व निर्धारित भाडे याबद्दल माहिती भरण्यात येईल. मासिक पासधारक याच कार्डवर नियमित रिचार्ज करून प्रवाससेवा नियमित ठेवू शकणार आहेत. प्रवाशाची आवश्यक माहिती स्मार्ट कार्ड मधील मायक्रो चिपमध्ये संकलित असणार आहे.
पहिल्या टप्प्यात जेष्ठांसाठी स्मार्टकार्ड वितरणाचे काम प्रत्येक आगरस्तरावरून सुरु करण्यात आले आहे. पास वितरण खिडकीवर विहित अर्ज भरून देऊन यासाठी नोंदणी करता येणार आहे. चार किमी वार्षिक मोफत प्रवास मर्यादा जेष्ठाना राहणार असली तरी सध्या आधारकार्ड मध्ये जन्म तारखेत फेरफार करून अनेक प्रवासी स्वतःला जेष्ठ म्हणवून घेत प्रवास करीत असतात. मात्र स्मार्ट पास मुळे आता त्यांचा प्रवास थांबणार आहे.
—————————————————————————————————————————————–
जेष्ठांसाठी ५० रुपये नोंदणी शुल्क 
सध्याच्या कार्यप्रणालीच्या आधारे जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड साठीत्यांचा आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. आधारच्या माध्यमातून बायोमेट्रिक द्वारे पडताळणी करून त्याची माहिती फोटोसहित एसटीला प्राप्त होणार आहे. यानंतर संबंधित प्रवाशाकडून स्मार्टकार्ड फी ५० रुपये घेण्यात येईल. व संगणकीकृत पावती देण्यात येईल. नोंदणी पूर्ण झाल्यावर ट्रायमॅक्स कंपनीकडून १० दिवसांनी स्मार्टकार्ड प्रिंट करून संबंधित आगारकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर प्रवाशाला हे स्मार्टकार्ड संगणकावर इश्यू करून देण्यात येईल. विद्यार्थ्यंसाठी देखील हीच प्रणाली असून त्यासाठी नोंदणीशुल्क मात्र ५ रुपये ठेवण्यात आले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!