Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढील तीन दिवस ‘या’ मार्गावरील बस बंद

Share

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीसाठी महामंडळाकडून बसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या तसेच मुक्कामी जाणाऱ्या बसेस पुढील तीन दिवस या मार्गावर धावणार नसल्याचे सूचना महामंडळाने प्रवाशांसाठी आज दिली आहे. उद्यापासून या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे दैनंदिन चाकरमान्यांचे नियोजन कोलमडणार आहे.

विधानसभेच्या कामकाजासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या ने-आण करण्यासाठी बसेस वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये नाशिक मध्यवर्ती बसस्थानकावरुन सुटणाऱ्या ओझरखेड, बालापाडा, राक्षसभवन, सायखेडा (पिंप्री), मुळेगाव, मोडाळा-कनाशी, उंबरठान, करंजुल, सायखेडा (ओढामार्गे), तोरंगण, सुरगाणा, नांदुरीगड, नंदुरबार, लोणखेडी, रो. माळेगाव, भुतमोखाडा, नळवाडी, ठाणापाडा, सायखेडा, अंबोडा, शिवणगाव या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

या परिसरातुन नाशिकला विद्यार्थी, कामगार व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे त्यांचे वेळापत्रक ढासळणार असल्याने नागरिकांना गैरसोयीच्या ञासाला सामारे जावे लागणार आहे. मध्यवर्ती बसस्थानक विभागाने याबाबत सूचना फलक लावले असुन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.


पुढील तीन दिवस गैरसोय होणार

बससेवा बंद राहणार असल्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. खासगी वाहनाने येण्यासाठी अतिरिक्त भाडे देऊन शहर गाठावे लागेल. या भागातून अनेक शालेय विद्यार्थी, चाकरमानी, जेष्ठ नागरिक नियमित जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करतात त्यांनाही फटका बसणार आहे.

-संदिप मोरे, प्रवासी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!