Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या साक्षी व प्रियांकाच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे महाराष्ट्राचा मोठा विजय

Share

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या नाशिकच्या साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्ध शतकीय तडाखेबंद फलंदाजीमुळे महाराष्ट्राने सिक्किम वर मोठा विजय मिळविला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित पुदुचेरी येथे आज पासून सुरु झालेल्या तेवीस वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने सिक्किम वर 108 धावांनी दणदणीत विजय मिळविला.

निर्धारित 20 षटकांत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 180 अशी मोठी धावसंख्या उभारली यात साक्षी कानडी च्या केवळ 50 चेंडूतील फटकेबाज 76 व प्रियांका घोडके च्या 59 चेंडूतील दमदार 61 धावांचा मोठा वाटा होता. 181 धावांच्या आव्हाना समोर सिक्कीमचा संघ 9 बाद 72 इतकीच मजल मारू शकला.

गोलंदाजीत देखील नाशिकच्या फिरकीपटू माया सोनवणे एक गडी बाद करून विजयाला हातभार लावला. महाराष्ट्र संघाचा पुढील तामिळनाडू बरोबर 13 नोव्हेंबर रोजी सामना होणार आहे.

नाशिकच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी या युवा महिला क्रिकेटपटूंचे चे अभिनंदन करून उर्वरीत स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!