पुणे : वाजगावच्या दुर्गाला अँथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण

0

भऊर | वार्ताहर

देवळा तालुक्यातील वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरेने युथ गेम स्पर्धत महाराष्ट्राला १५०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिल्याने दुर्गाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पुणे येथे ‘खेलो इंडीया, युथ गेम’ या राष्ट्रीय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा १७ व २१ वर्ष वयोगटात होत असून देवळा तालुक्यातील वाजगाव येथील दुर्गा प्रमोद देवरे हिने अँथलेटिक्समध्ये १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धत सुवर्णपदकाला गवसणी घातली.दुर्गाने हे अंतर ४ मिनीट ३७ सेकंदात पूर्ण केले.

दुर्गाने यापूर्वी चीन, जपान, फिनलंड, श्रीलंका, दोहा, कतार आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभाग घेऊन पदकांची कमाई केली आहे.

प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिने केलेल्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल सर्वच स्थरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*