Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलीस अधीक्षकांचा इंगा; विशेष पथक स्थापन करत सव्वा कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Share

नाशिक | प्रतिनिधी 

लोकसभेच्या तोंडावर नाशिकचे भूमिपुत्र संजय दराडे यांची बदली झाली होती. त्यांच्या ठिकाणी डॉ. आरती सिंग यांची नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. सिंग यांनी ०२ मार्च २०१९ ला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर केलेली धडक कारवाईत डॉ. सिंग यांनी १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  तर   ९२८ पेक्षा अधिक संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. सिंग यांनी सुरुवातीपासूनच धडक कारवायांना सुरुवात केली होती याबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्यापुढील आगामी आव्हाने काय असतील याबाबत सांगितले होते.  अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत विशेष पथके स्थापन करत जिल्हाभरात धडक कारवाई केली.

त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून विविध गुन्हा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेकडो संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली आहे.

डॉ. सिंग यांनी 581 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये 423 संशयित आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.  या कारवाईद्वारे जवळपास  71 लाख 72 हजार 658 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच जुगार कायद्याखाली एकुण 202 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 463 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 38 लाख 16 हजार 444 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी  विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, पिंपळगांव,
वणी, नाशिक तालुका, ओझर, देवळा, पेठ, सिन्नर, दिंडोरी, सायखेडा, मालेगांव तालुका, लासलगांव,  सुरगाणा, येवला, व वडनेरभैरव या पोलीस ठाणेच्या हद्दीत छापे टाकून करावी केली.

या कारवाईत दारुबंदी कायद्याखाली 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 15 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून  20 लाख 1 हजार  904 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तसेच जुगार कायद्याखाली 10 केस दाखल करण्यात आल्या असून जवळपास 33 संशयितांना ताब्यात घेऊन 7 लाख 11 हजार 670   मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी 43 वाहने ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!