Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मुलाने दिव्यांग वडिलांना सप्तशृंगी गडावर आणून सोडले; मुलांचा शोध सुरु

Share

वार्ताहर | सप्तशृंगी गड

ज्या वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकरांना लहानाचे मोठं केलं. त्यांना जगण्यासाठी, शिकवण्यासाठी अन स्वतःच्या पायावर राहण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या भल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या अशा बापाला अकाली मुलांच्या काळजीपोटी अंध व्हावं लागलं. जेव्हा त्यांना आरामाची गरज होती असा बाप मात्र मुलांना घरात अडचण वाटू लागला आणि सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनाचे नाव करत मुलाने एका पाहुण्याच्या मदतीने या बापाला सोडून पोबारा केला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी सप्तशृंगी गडावर हा प्रकार घडला. वडील दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. मात्र, सावध आहेत. त्यांना जे विचारले ते बरोबर सांगतात. सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार गेला.

त्यांनी याबाबत चौकशी केली. ते ते आजोबा म्हणाले, माझं नाव कपालेश्वर वायाळ (वय ६५) मु. पो.म्हेसगाव तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मुलगा सचिन वायाळ याने मी अंध असल्यामुळे मला सप्तशृंगी गडावर डोळ्यांचा ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला जायचे असे खोटे सांगत गडावर आणून सोडले.

स. नि.देवी ट्रस्ट व्यावस्थापक सुदर्शनजी दहातोंडे यांना सर्व माहिती सविस्तर माहिती मिळताच रात्री ९ वाजेचा सुमारास दहातोंडे यांनी राहुरी तालुक्यातील पोलिस स्थानकात भ्रमणध्वनी नुसार किसन वायाळ यांचा मुलगा सचिन वायाळ यांनी वडिलांना खोटे सांगत पोबारा केल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर सुरक्षा रक्षक पंडित कळमकर, सप्तशृंगी गडावरचे उद्योजक न्यानेश्वर सदगीर, पत्रकार इम्रान शाह, संतोष पाटील पोलीस कर्मचारी ब्राह्मणे यांना घेऊन नांदुरी येथील सप्तशृंगी वयोवृद्ध  अनाथ आश्रमात आश्रम अध्यक्ष गंगा पगार यांना सर्व हकीकत सांगुन आश्रमात स्वाधीन केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!