द्वारका वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपयायोजनांची गरज

0
Nashik (फारूक पठाण) । द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. फक्त वाहतूक इतरत्र फिरवून चालणार नाही तर काही ठोस उपयायोजना आखण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे.

सर्वात पहिले भुयारी व उड्डाणपुलाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे.
लहान मोठे असे सुमारे 11 ठिकाणचे मार्ग या द्वारका चौफुलीवर मिळतात. यामध्ये दोन महामार्ग देखील आहे. नाशिकच्या विकासात भर घालणार्‍या उड्डाणपुलाचा वापर ज्या प्रमाणे व्हायला हवा, तसा होतांना दिसत नाही. उड्डाणपुलावर जाण्यासाठी दोन व चढण्यासाठी दोन अशा एकूण चार ठिकाणी सोय आहे.

त्याचप्रमाणे भुयारी मार्गात जाण्यासाठी व निघण्यासाठी एकूण चार प्रवेशव्दार देखील याच ठिकाणी देण्यात आलेले आहे. अशा एकूण 8 ‘ंपंचर’ असतांना व शहरातील मोठमोठ्या भागांना जोडणार्‍या द्वारका चौकात लहान वाहनांची सर्वात जास्त संख्या लक्षात घेता फक्त ‘यु टर्न’ ची संख्या वाढवून भागणार नाही. तर यासाठी काही ठोस पर्यायांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

उड्डाणपुलावरुन दूरवर जाणार्‍या मोठ्या वाहनांना द्वारका चौफुलवर उतरण्यापासून बंदी घाण्यात यावी, कारण मोठे वाहन खाली आल्यावर त्यातील काही वाहने या ठिकाणावरुन प्रवासी भरतात. एक वाहन प्रवासी भरण्यासाठी येथे थांबली की त्याच्या मागे इतर वाहने थांबतात.

यामुळे काही क्षणात वाहतूक कोंडीला सुरुवात होते. जर अशा वाहनांना खाली उतरण्याची परवानगी नकारली तर असे प्रकार बंद होतील. त्याच प्रमाणे उड्डणपुलाचा वापर देखील वाढेल व चौकातील वाहन संख्या कमी झाल्याने लहान वाहनांना जाण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल. व कोंडी आपोआप कमी होण्यास मदत मिळेल. त्याच प्रमाणे भुयारी मार्गाचा वापर देखील वाढविण्यात यावा.

पादचारी याचा उपयोग करीत नसेल तर त्यातून कमीतकमी लहान वाहने जातील अशी तरी सोय करण्यात यावी. जर असेही होत नसेल तर थेट भुयारी मार्गच बंद करुन त्याचे सर्व प्रवेशव्दार सपाट करुन जागा मोकळी करण्यात यावी. यामुळे तरी चौकात इतर वाहनांना जाण्यासाठी जागा मिळेल. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत वाहने देखील वाढत आहे. म्हणून ठोस काम झाल्याशिवाय द्वारकाची वाहतूक कोंडी सुटणार नाही, असे जाणकार म्हणतात.

प्रयोगातून अभ्यास : सोमवारी शहर वाहतूक पोलीस दलाच्या वतीने ‘यु-टर्न’ चा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे विशेष असा फरक जरी पडला नसला तरी वाहनधारकांना आलेल्या अडचणींचे निरिक्षण झाले. पोलिसांनी चार ठिकाणी कॅमेरे लाऊन नोंदीही केली. मोठ्या वाहनांना वळण घेता येत नव्हते, ही एक मोठी समस्या समोर आली. तर यु टर्न, क्रॉसींग एकत्रच आल्याने वाहने अडकत होती. तरी पोलीस प्रशासन अभ्यास करीत असून लवकरच सक्षम पर्याय समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

*