Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : खड्ड्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू; मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

काल (दि. ३१) गंगापूर रोड येथील एका शाळेत कपाट अंगावर पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बांधकामसाठी  खोदलेल्या खड्ड्यात पडून आज सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अधिक माहिती अशी की, आज सकाळी सहा वर्षीय बालक अक्षय साठे हा संत कबीर नगर परिसरातून जात होता. याच परिसरात बांधकाम सुरु आहे. बांधकाम साठी खोदलेल्या खड्यात पाणी असल्यामुळे या बालकाचा खड्यात बुडून मृत्यू झाला.

संत कबीर नगर येथील मनपाच्या शाळेत अक्षय पहिलीत शिकत होता. सकाळी सात वाजता अक्षय शाळेत गेला होता. शाळा आज ७ ते १२ होती, मात्र अक्षय शाळेतून साडेनऊच्या दरम्यान घराकडे परत निघाला असताना ही घटना घडली.

घटनेबाबत शिक्षकांना कुठलीही कल्पना नसल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!