Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निफाड : वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछडयाचा मृत्यू

Share
वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछडयाचा मृत्यू, nashik news six months leopard dies in an accident

निफाड | प्रतिनिधी

नाशिक,औरंगाबाद महामार्गावर चांदोरी शिवारातील खरात पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा सहा महिन्याचा नर जातीचा बछडा ठार झाला.

रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मृत बछड्यास वनविभागाच्या निफाड येथील रोपवाटिकेत आणून आज सकाळी पशुवैधकीय अधिकारी रवींद्र चांदोरे यांनी शवविच्छेदन केले.

बछड्याच्या तोंडावर व डोक्याला जबर मार लागल्यामुळे बछडयाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याच रोपवाटिकेत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

याप्रसंगी सहाय्यक वनरक्षक सुनील नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक विजय टेकनर व कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!