Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बँका ६ दिवस बंद; मंगळवारी बँक कर्मचारी संपावर

Share

नाशिक । प्रतिनिधी

ऑक्टोबर महिना संपायला केवळ दोन आठवडे उरले असून या दोन आठवड्यात तब्बल ६ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीच्या कालावधीत दि. २० ते २९ ऑक्टोबर दरम्यान ५ दिवस सुट्ट्या आहेत. तर सरकारच्या बँक विलीनीकरण धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी मंगळवारी दि. २२ रोजी कर्मचारी संघटना संपावर जाणार आहेत.

ऐन दिवाळीत सुट्टीमुळे बँका ५ दिवस बंद राहणार असून त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. त्यातच केंद्र सरकारने घेतलेल्या बँक विलीनीकरण धोरणाच्या निषेधार्थ येत्या मंगळवारी दि. २२ अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना ही राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांची देशातील सर्वात जुनी व मोठी असणारी संघटना एक दिवसाचा संप पुकारत आहे.

परिणामी त्या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता सर्व सर्व बँकांचे व्यवहार ठप्प असणार आहेत. इंडियन बँक्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी महासंघ या संघटना देखील या संपात सहभागी असणार आहेत. दि. २२ ऑक्टोबरपूर्वी २० ला रविवारची सार्वजनिक सुट्टी असून दि. २६ ऑक्टोबरला चौथा शनिवार, रविवारी दि. २७ ऑक्टोबरला दिवाळी व रविवार असल्याने बँकांचे कामकाज बंद असणार आहे. सोमवारी दि, २८ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा व गोवर्धन पूजा असल्याने या दिवशी देखील बहुतांश बँका बंद राहणार असून मंगळवारी (दि.२९) भाऊबीजेची सुट्टी असणार आहे.

सरकारने १० बँकाच्या विलीनीकरणाची घोषणा केली असून या विलीनीकरनंतर चार नव्या बँका अस्तित्वात येणार आहेत. तर आंध्र बँक, इलाहबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांचे अस्तित्व इतिहास जमा होणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी गेल्या महिन्यात बँक अधिकारी दोन दिवस संपावर जाणार होते. मात्र केंद्रीय अर्थसचिवांनी मध्यस्थी केल्याने तो संप टाळला होता. आता कर्मचारी संघटना आंदोलनात उतरत आहेत. बँक विलीनीकरण धोरणामुळे देशात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २२ वरून १२ इतकी झाली आहे. सरकारने विलीनीकरणाच्या निर्णय घेण्याऐवजी कर्ज वसुलीचे कायदे कडक करावेत अशी या संघटनांची मागणी आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!