Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांना पुन्हा सकाळी दहाच्या भोंग्याचा आवाज ऐकू येणार

Share

नाशिक | संदिपकुमार ब्रह्मेचा

मोठ्या शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका इमारत, नगर पालिका आणि नगरपरिषद याठिकाणी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता यावे, जनजीवन सुरळीत सुरु राहावे यासाठी वेगवेगळ्या वेळेत भोंग्याचा आवाज होत असे. नाशिक शहरातही गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात हा भोंगा सकाळी दहाच्या सुमारास वाहत होता. पाच किमी पर्यंत या भोंग्याचा आवाज ऐकू जात होता. दरम्यान, शहराच्या सीमा वाढल्या आहेत त्यामुळे याठिकाणी मोठ्या आवाजाची प्रणाली याठिकाणी बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास,शहरावर संकट आल्यास नागरिकांच्या सतर्कतेसाठी पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरील भोंगा वाजायचा तसेच सकाळी दहा वाजताही भोंग्याचा आवाज कानावर पडायचा… नियमित कानावर पडणारा भोंगा जुनाट झाला. त्याची क्षमता कमी पडू लागली. तर गेल्या वर्षभरापासून हा भोंगा बंद अवस्थेत पडून आहे.

नाशिक शहराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. यादरम्यान, केंद्र सरकारने नागरी संरक्षण संचालनालयातील जुनाट यंत्रणा बदलण्याच्या सूचना दिल्या असून यातून नव्या स्वरुपाची हायटेक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

त्यानुसार बेंगलोर मधील एका खाजगी कंपनीला हे काम देण्यात आले असून त्याची पहिली चाचणी देखील मुंबईत पार पडल्याची खात्रीशीर माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हा होता उद्देश 

नाशिक शहराला ब वर्ग शहराचा दर्जा दिल्यानंतर १९७१ सालापासून नागरी संरक्षण दलाचे कार्यालय नाशिकला आले. शहरावर आलेल्या संकटाची चाहूल, महापूर किंवा आपातकालीन परिस्थितीची जाणीव नागरिकांना व्हावी या उद्देशाने हा भोंगा सुरु झाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!