पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू

0

सिन्नर | विलास पाटील

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ताब्यात असलेल्या आरोपीचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

तालुक्यातील पाटोळे येथील अश्विनी जालिंदर खताळे या नवविवाहितेने छळाला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यानंतर तिचा नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास मृत्यू झाला होता.

दरम्यान, मयत अश्विनीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जालिंदर याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी त्याला दोडीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते, तेथे सर्व तपासण्या झाल्या. यावेळी अहवालात तपासण्या नॉर्मल असल्याचे नमूद केले होते.

तरीदेखील रात्री 9.30 च्या दरम्यान त्याला उलटया चा त्रास होऊ लागल्याने नगर परिषद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचारानंतर फरक न पडल्याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरू असताना आज सकाळी 7.30 च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे पती जालिंदर यांनी विष प्राशन करू शकत नाही. तसेच खैरनार नामक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीत विष प्राशन केले नसल्याचे सांगितले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही ‘देशदूत’शी बोलताना खैरनार यांनी दिली.

अचानक मृत्यू होईल असे काय घडले असावे असा प्रश्न पंचक्रोशीतील नागरिकांना पडला आहे.दरम्यान, कोठडीत मृत्यू झालेल्या संशयितांचे शवविच्छेदन धुळे येथील रुग्णालयात केले जाते.

त्यामुळे मृतदेह धुळे येथे हलविण्यात आला आहे. धुळे येथील शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूबाबत सत्य उलगडणार आहे.

LEAVE A REPLY

*