Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माजी आमदार सूर्यभान गडाख अनंतात विलीन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सिन्नर तालुक्यातील औद्योगिक क्रांतीचे जनक, देवपूरचे भूमिपूत्र माजी आमदार सूर्यभान सुकदेव गडाख (वय ९३) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज सिन्नर येथील एसजी पब्लिक स्कुलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

काल गडाख यांनी नाशिक येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये रात्री साडेआठ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

औद्योगीकरणाशिवाय तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून माजी आमदार गडाख यांनी आशिया खंडातील पहिली सहकारी औद्योगिक वसाहत उभी केली होती.

तालुका बोर्ड सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्यपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. याशिवाय त्यांनी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. शेती, कडवा प्रकल्प, मीटर मीटर हाटाव आंदोलन, दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी, दळणवळण साधनांचा विकास अशा अनेक कामांतून गडाख यांनी राज्यभर आपली ओळख निर्माण केली.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!