Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

एकदाच वापर होणार्‍या प्लास्टिकवर निर्बंध; पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण देशात आजपासून सक्ती

Share

नाशिक । प्रतिनिधी

उद्या (दि.2) पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून देशभरात एकदाच वापर करता येणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध लावण्यात येणार आहेत. पर्यावरणाला हानी पोहचवणार्‍या प्लास्टिकपासून मुक्ती मिळावी यासाठी ही सक्तीची बंदी घातली जाणार आहे. या उपक्रमात देशवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात या कार्यक्रमातून नुकतेच केले होते.

सन 2022 पर्यंत देशाला पूर्णतः प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी आपल्या सवयी बदलाव्यात असेही मोदी यांनी मन की बात मध्ये बोलतं असताना म्हटले होते. प्लास्टिक हटाव अभियानात केवळ एकदाच वापरता येणारे प्लास्टिक उदा.प्लास्टिक कप, स्ट्रॉ, पिशव्या यांच्या वापरावर ग्रामीण व शहरी भागात कायमस्वरूपी निर्बंध घालण्यात आले आहेत.

सरकारी निर्णयानुसार यापुढे प्लास्टिक बाटली, प्लास्टिक कप, प्लास्टिक स्ट्रॉ, सॅशे पाऊच, 35 एमएम हुन कमी जाडीच्या हॅन्डल सोबत किंवा शिवाय येणार्‍या प्लास्टिक पिशव्या ,थर्माकॉल कप, प्लेट्स, बश्या, चमचा, , डेकोरेशन साठी वापरण्यात येणारे थर्माकोल किंवा प्लास्टिक (उदा.मखर), वस्तूंसाठी पॅकेजिंग म्हणून वापरण्यात येणारे थर्माकोल व प्लास्टिक यावर बंदी ही असणार आहे.

असे असले तरी काही विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक वापरावर मात्र अद्याप बंदी आणलेली नाही, म्हणजेच पुनर्वापर होऊ शकणारे प्लास्टिक उदा. 35 एमएम हुन अधिक जाडीच्या पिशव्या, निर्मिती प्रक्रियेत वापरले जाणारे प्लास्टिक याचा मात्र वापर करता येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे प्लास्टक बॅन करण्यात आले होते.

केंद्राच्या उद्यापासून अमलात येणार्‍या निर्णयामुळे यावेळेस तब्बल 6 महत्वपूर्ण प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंच्या वापरावर बंदी आणली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात या वस्तूंचा तब्बल 14 मिलियन वापर वापर घटण्याची शक्यता सरकारी सूत्रांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान या निर्णयाच्या अंलबजावणीसाठी प्लास्टिकच्या वापरवरील बंदी पासून ते निर्मिती पर्यंत निर्बध घातले जाणार आहेत.

या संदर्भात सर्व राज्यांसाठी एक आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक अशा दोन अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उपक्रम, सर्व सरकारी व खासगी कंपन्या, कार्यालये यांचा त्यात समावेश आहे. सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारी व खासगी कार्यालयात प्लॅस्टिक व थर्माकोलची फुले, बॅनर्स, झेंडे, कुंड्या, बाटल्या, फोल्डर्स वा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तू न वापरण्याची ताकीद आहे.उत्पादन करणार्‍या कारखान्यांनी एकदाच वापरता येणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या वा वस्तू तयार करू नयेत प्लास्टिकच्यापुनर्वापराची व नष्ट करण्याची व्यवस्था करावी, असेही असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.या आधी 2016 मध्ये केंद्र सरकारने अशाच सूचना प्लास्टिक उद्योगाला दिल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!