Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आता मद्यासह एकल दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत...

नाशिकमध्ये आता मद्यासह एकल दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहणार

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील रेड व आॅरेंज झोनमधील मद्य, जीवनावश्यक वस्तू व परवानगी देण्यात आलेली एकल दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहतील. याबाबत गुरुवारी (दि.७) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश जारी केले आहेत. मात्र, कंटेंटमेंट झोनमध्ये पुर्वी प्रमाणे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेतच दुकाने सुरु राहतील.

- Advertisement -

जिल्ह‍ा प्रशासनाकडून किराणा, मेडिकल, भाजीपाला, दूध व इतर जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सकाळि दहा ते दुपारी चार या वेळेत खुली राहतील असे आदेश दिले होते. मात्र, या सहा तासाच्या वेळेत जीवनाश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत होती.

त्यामुळे किराणा दुकाने व इतर ठिकाणी सोशल डिस्टनसचा फज्जा उडत होता. खरेदीसाठी वेळ वाढवून द्यावी अशी नागरिकांची मागणी होती. दुकानदारांनी देखील जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी केली होती.

याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली होती. भुजबळांनी करोनाच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मद्यासह सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनि काढले आहेत. त्यामुळे सर्व दुकाने आता दिवसातून आठ तास सुरु राहणार अाहेत. तर दुधाचि दुकाने पुर्वी प्रमाणे दिलेल्या वेळेत सुरु राहतील. त्यात कोणताहि बदल करण्यात आला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या