Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : एका रात्रीत शेकडो झाडांवरील कुऱ्हाड चुकीची : शिवसेना

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कोर्ट ऑर्डर ऑनलाईन न टाकताच एका रात्री शेकडो झाडांवर मारलेली कुऱ्हाड पूर्णपणे चुकीची आहे. आरे च्या जंगलतोडीसंदर्भातील याचिका उच्च न्यायलयाने फेटाळली असली तर याचिका सुप्रीम कोर्टात जाईल, तेथील निर्णय यायचा आहे. त्याआधीच आरेमधील जंगल ओसाड केल्याची टीका आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. त्या नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत होत्या.

त्या म्हणाल्या, जगभरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल वार्मिंगवर धडे देत आहेत. मात्र, दुसरीकडे काही महात्वाकांशी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झाडांची कत्तल केली जात आहे.

जगभरात तापमानात अनेक बदल झाले आहेत. ठिकठिकाणी अतिवृष्टी होत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट ओढवले आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी वृक्ष संवर्धन झाले पाहिजे असे गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

काल उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर याचिकेबाबतचे ऑर्डर ऑनलाईन न येताच एका रात्रीत झाडांची पोलीस बंदोबस्तात कत्तल करण्यात आली, हे पूर्णपणे चुकीचे आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत रोष व्यक्त करत आरे कॉलनीतील झाडांची कत्तल म्हणजे पाकव्याप्त काश्मीरवरील हल्लाच असल्याचे म्हटले आहे.

आरे कॉलनीतील जंगल वाचविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आहे. याला शिवसेनेचा पाठींबा आहेच. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह अनेक   कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हा घाला घालण्यात आल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!