Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हेमंत गोडसेंच्या विजयाची औपचारिकता बाकी; अठराव्या फेरीअंती २ लाख १६ हजारांची आघाडी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांना १८ व्या फेरीअंती तब्बल २ लाख १६ हजारांची आघाडी मिळाल्याने जवळपास त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

नाशिकमध्ये खासदार कधीच रिपीट होत नाही असे म्हटले जायचे. मात्र, यंदा शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्याची तयारी केल्यामुळे हा इतिहास मोडीत निघाला असून नाशिककर विकासाच्या पाठीमागे उभे राहून परिवर्तन घडवता काम करणाऱ्या लोक प्रतिनिधीला लोकसभेत पाठवतात अशी चर्चा सोशल मीडियात फिरत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत असून गोडसे यांनी सहाव्या फेरीअंती निर्णायक आघाडी घेतली आहे.

गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे मोदी लाटेत लोकसभेच्या तिकिटावर निवडणून आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!