Type to search

राज्यात आणि देशात युतीची मुसंडी

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

राज्यात आणि देशात युतीची मुसंडी

Share

मुंबई  | प्रतिनिधी

मतमोजणीच्या सुरुवातीलाच आलेल्या कलांनुसार लोकसभेच्या राज्यातील 48 जागांपैकी 9 जागांवर युतीने मुसंडी मारल्याचे दिसते. आघाडीचे उमेदवार 2 ठिकाणी पुढे आहेत. अर्थात हा  पोस्टल मतमोजणीचा कल होता. पुढील अर्धा तासानंतर मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू होणार आहे.

लोकसभा निकालाची देशभरात मतमोतणी सुरू झाली आहे. गुरूवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर 542 पैकी 71 जागांचे कल हाती आले होते.

त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसते. 44 जागी भाजपा व मित्रपक्ष तर 23 जागांवर काँग्रेस व मित्रपक्षांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 4 ठिकाणी अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान हे पहिले कल पोस्टल मतमोजणीचे आहे. त्यामुळे दिवस पुढे सरकेल तसे चित्र अधिक स्पष्ट होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!