Type to search

स्वराज्याची राजधानी रायगड शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

स्वराज्याची राजधानी रायगड शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली

Share

रायगड | वृत्तसंस्था

स्वराज्याची राजधानी रायगडावरील नगारखाना, होळीचा माळ, जगदिश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ सर्वत्र जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय संभाजी महाराज असा जयघोष किल्ले रायगडावर ऐकायला मिळत आहे.

सबंध महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. मोठ्या संख्येने शिवभक्त याठिकाणी दाखल झाले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच रायगडावर विदेशातील राजदूतही शिवराज्यभिषेक सोहळा दिन पाहाण्यासाठी उपस्थित आहेत.

आजही दिवसभरात दोन लाखांहून अधिक शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.  उदयनराजे भोसले यांनी पहाटेच रायगडावरील राज सदरेमधील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडपूजन केले. तसेच होळीच्या माळावरील पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यांनी मानवंदना दिली.

तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज सदरेत महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक दिन सोहळ्यासाठी दाखल होणार आहेत. किल्ले रायगडावर जमलेल्या लाखो शिवभक्तांकडून ‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषाने आज स्वराज्याची राजधानी दुमदुमली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!