Photo Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

0

नाशिक । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुख्य मिरवणुकीला वाकडी बारव येथून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीचा प्रारंभ पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाला.

एकूण सहा सार्वजनिक मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे 1 हजार 700 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे.

शिवजयंतीनिमित्त मुख्य मिरवणुकीला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पारंपरिक वाकडी बारव येथून श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण, पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल, मनपा गटनेते दिनकर पाटील, सुनील बागूल, सोनाली राजे पवार आदी उपस्थित होते.

युतीमुळे मार्ग सुकर

राष्टहितासाठी सक्षम व मजबूत सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी युती झाली आहे त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे नामदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या मंडळांचा आहे समावेश 

छत्रपती सेना, स्वराज्य प्रतिष्ठान इंदिरानगर, शिवसाई फ्रेंड सर्कल डिंगर अळी संभाजी चौक नाशिक, जनता मित्र मंडळ शिवाजी चौक, म्हसरूळ टेक नाशिक, गजानन महाराज मित्र मंडळ, अर्जुन क्रीडा मित्र मंडळ द्वारका, छावा मराठी युवा संघटना हनुमान नगर, नाशिक.

असा आहे मिरवणुकीचा मार्ग

वाकडी बारव (चौक मंडई) येथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ पुढे जहांगिर मस्जिद-दादासाहेब फाळके रोड-महात्माफुले मार्केट-भद्रकाली मार्केट- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा- मेनरोड- धुमाळ पाँईट- महात्मा गांधीरोड-सांगली बँक सिग्नल- मेहेर सिग्नल-स्वामी विवेकानंदरोड (जुना आग्रारोड)- अशोक स्तंभ-नवीन तांबट अळी- रविवार कारंजा- होळकर पुल- मालेगाव स्टॅण्ड-पंचवटी कारंजा-मालवीय चौक- परशुराम पुरीयारोडने विसर्जन ठिकाणी अर्थात रामकुंडापर्यंत पोहचेल.

LEAVE A REPLY

*